कोरेगाव-भीमा प्रकरणी पवारांना नोटीस!

09 Feb 2022 18:07:29

Sharad Pawar
 


 
 
मुंबई : कोरेगाव भीमा प्रकरण तपासाअंतर्गत चौकशी आयोगाचे कामकाज हे अद्याप सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आयोगाने चौकशीसाठी नोटीस बजावली.  दि. २३ आणि २४ फेब्रुवारी रोजी ते आपली साक्ष नोंदवण्यासाठी आयोगापुढे हजर राहणार आहेत. याच पार्श्वभूमीवर २१ ते २५ फेब्रुवारी दरम्यान निवृत्त न्यायमूर्ती जे.एन. पटेल यांच्या अध्यक्षतेखाली समितीचं कामकाज होणार असून यंदा मात्र ते पुण्याऐवजी मुंबईत होणार आहे.
 
 
शरद पवारांची साक्ष घेण्याची मागणी करणारा अर्ज विवेक विचार मंचचे सदस्य सागर शिंदे यांनी चौकशी आयोगाकडे केला होता. शरद पवारांनी भीमा-कोरेगाव प्रकरणी माध्यमांत केलेल्या काही विधानांवरून या घटनेसंदर्भात त्यांच्याकडे अधिकची माहिती उपलब्ध असण्याची शक्यता असल्याचे या अर्जात म्हटले होते. यापूर्वी ४ एप्रिल रोजी शरद पवारांना चौकशी आयोगापुढे साक्ष देण्यासाठी हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले होते. मात्र ते या सुनावणीला हजर न राहिल्याने येत्या २३ आणि २४ फेब्रुवारी रोजी ते साक्ष देण्यासाठी हजर राहणार आहेत.
 

Powered By Sangraha 9.0