काँग्रेस विचारसरणी नक्षलींकडून हायजॅक

08 Feb 2022 14:23:18
                                      
narendra modi
 
 
 
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देण्यासाठी राज्यसभेत बोलत होते. या भाषणातून त्यांनी काँग्रेसवर घणाघाती हल्ले केले. या भाषणात मोदींनी काँग्रेस या देशात नसती तर देशात काय काय झाले असते? याची यादीच आज राज्यसभेत वाचून दाखवली. याच भाषणादरम्यान त्यांनी काँग्रेसची विचारसरणी शहरी नक्षलींनी हायजॅक केली आहे असा आरोप काँग्रेस वर केला.
 
"काँग्रेस नसती तर देशात आणिबाणी आली नसती. काँग्रेस जर नसती तर १९८४ ची शीखविरोधी दंगल झाली नसती. काँग्रेस आमच्यावर इतिहास बदलविण्याचा आरोप करत आहे पण काँग्रेस ची विचारसरणी तर शहरी नक्षलवाद्यांनी हायजॅक केली आहे." जसे आरोप पंतप्रधान मोदींनी राज्यसभेत केले.
 
 
महात्मा गांधींच्या सांगण्यावरून जर काँग्रेस विसर्जित झाली असती तर देशात घराणेशाही आली नसती. देश राष्ट्रवादी विचारनवर चालला असता दुसऱ्या देशांच्या इशार्यावर नाही.
 
 
 
Powered By Sangraha 9.0