अशक्यतांचा मनोव्यापार आणि शक्यतांचे पाईक

08 Feb 2022 11:49:53

im possible
 
 
‘मला शक्य आहे आणि मला शक्य नाही,’ अशा शक्य-अशक्यतेच्या दोन टोकांवर झुलणारे लोक अधिक आहेत. आव्हानात्मक परिस्थिती समोर ठाकली की बरेचजण नवीन प्रसंग किंवा अपरिचित प्रसंग टाळतात. आपल्याला असुरक्षित किंवा अपरिचित प्रसंग टाळतात. आपल्या सुरक्षित किंवा परिचित सीमारेषेच्या बाहेर पडायचे सहसा लोकं टाळतात. कारण, त्यात गैरसोय अधिक असते. शक्यतेचा विचार करणारे लोक अशक्यतेच्या विचारांनी त्रस्त असलेल्या लोकांपेक्षा बराच वेगळा विचार करतात. ते जीवनात धोका पत्करायला, नवनवीन प्रयोग करायला वा नवीन कौशल्य शिकायला तयार असतात.
 
कुणा एका तत्त्ववेत्त्याने म्हटले आहे की, ''Life is like stepping on to a boat this is about to sail out to sea & sink.'' आयुष्याबद्दलचे हे असे काही वक्तव्य की, ज्यात भविष्याबद्दल हुरहूर दिसून येते. तेव्हा बहुतेक माणसांना ते नकारात्मक आणि निराशाजनकच वाटत राहतं. पण, लक्षात घ्यायला पाहिजे की, एखाद्या झाडाच्या तुटणाऱ्या फांदीवर पक्षी विराजमान झालेला असला, तरी त्याला भीती वाटत नाही. कारण, त्याचा विश्वास त्याच्या पंखांवर आहे, त्या तुटणाऱ्या फांदीवर नाही. थोडक्यात काय, तर स्वत:वर विश्वास ठेवायला पाहिजे. जगात तसे अनेक प्रकारचे लोक आहेत. पण, ‘मला शक्य आहे आणि मला शक्य नाही,’ अशा शक्य-अशक्यतेच्या दोन टोकांवर झुलणारे लोक अधिक आहेत. आव्हानात्मक परिस्थिती समोर ठाकली की बरेचजण नवीन प्रसंग किंवा अपरिचित प्रसंग टाळतात. आपल्याला असुरक्षित किंवा अपरिचित प्रसंग टाळतात. आपल्या सुरक्षित किंवा परिचित सीमारेषेच्या बाहेर पडायचे सहसा लोकं टाळतात. कारण, त्यात गैरसोय अधिक असते. शक्यतेचा विचार करणारे लोक अशक्यतेच्या विचारांनी त्रस्त असलेल्या लोकांपेक्षा बराच वेगळा विचार करतात. ते जीवनात धोका पत्करायला, नवनवीन प्रयोग करायला वा नवीन कौशल्य शिकायला तयार असतात. आपल्या आरामदायक सीमारेखा ते वाढवत असतात आणि त्यासाठी स्वत:ला वाकवण्यास वा ताणण्यास ते तयार राहतात. ‘आपण करू शकू’ हा विचार त्यांच्या मनात ठामपणे असतो. त्यांना निश्चित माहीत नसतं की, ते खरंच करू शकतील की नाही, पण ते सकारात्मक असतात. आपण पुढे जाऊ शकतो, हा विश्वास त्याच्यांत असतो. जरी पुढे गोष्टी त्यांच्या विचारांप्रमाणे जरी घडल्या नाहीत किंवा यशस्वी झाल्या नाहीत, तरी आपण उत्तम प्रयत्न केला, याचं समाधान मात्र त्यांना असतं. याच्या अगदी विरुद्ध टोकाला ‘अशक्य’ व्यक्तींचा मनोव्यापार असतो. त्यांना सतत आरामदायी वा सुखदायक जीवन जगायला आवडतं. त्यांना आयुष्यात धोका पत्करायचा नसतो. एखादी गोष्ट आपण मिळवू शकू या विचारांपेक्षा ‘आपण एखादी गोष्ट गमावली तर...’ या साशंकतेने ते त्रस्त असतात. म्हणून अशा व्यक्ती अपरिचित गोष्टी टाळतात. आयुष्यातील आव्हानांना धोका समजतात. व्यक्ती आपल्या आयुष्यातील येणाऱ्या संधीकडे वा आव्हानांकडे कशा पद्धतीने पाहतात, हे शेवटी महत्त्वाचे असतात.
 
 
‘मला तणाव हाताळायला जमणार नाही’, ‘ मला नोकरी मिळणार नाही’, ‘मी जसा आहे तसाच बरा’, ‘मला बदलायला जमणार नाही’ ही उदाहरणं अशक्यतेच्या विळख्यात सापडलेल्या लोकांची असतात. त्यांच्या अंतर्मनात प्रतिबिंबीत झालेले हे विचार आहेत. त्यांच्या मनात या लोकांनी त्यांच्यात आणि शक्यतेच्या जगाशी एक अभेद्य भिंत निर्माण केली आहे. यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की, एकदा का अशक्यतेच्या दुनियेत या लोकांनी मनाने प्रवेश केला की, ते स्वत:ला बदलायचा प्रयत्न करूच शकत नाहीत. त्याचा एक कायमचा करार होतो तो, अशक्य विचारांशी!
 
 
पण, शक्यतेचे पाईक ‘मी हे करू शकतो’, ‘मी ते करू शकतो’, ‘मी काहीही करू शकतो’ अशा त्रिवार प्रणालीशी निगडित असल्याने त्यांचे मन नवीन कल्पना, नवीन माहिती, नवीन प्लानिंग या गोष्टींच्या शोधात असतात. आपले इप्सित साध्य करण्यासाठी भरपूर ‘होमवर्क’ करतात. अशा व्यक्ती अनेक लोकांशी वार्तालाप करतात. आपली स्वत:ची गणितं मांडतात. एकंदरीत आपण एखादी गोष्ट नक्कीच करणार आहोत, याची खात्री मनात बाळगून असतात आणि प्रश्न फक्त हा असतो की, ते कसे करणार? यामुळे खऱ्या अर्थाने ही लोकं आपल्या कर्माचा पाठपुरावा करतात. काही गोष्टी आपल्याला अशक्यतेतून शक्यतेकडे घेऊन जाण्यासाठी लक्षात ठेवल्या पाहिजेत. तुमचे नकारात्मक विचार प्रभावी असतात, ते तुमचा आत्मविश्वास संपवतात आणि आपलं जीवन केवळ अशक्यप्राय आहे, या विचारांचा पगडा तुमच्या मनावर बसतो.
 
 
सकारात्मक विश्वास हे अधिक प्रभावी असतात. ‘तुम्ही काहीही गोष्टी करू शकाल’ असा विचार करण्यास समर्थ असाल, तर आपले विचार व स्वप्न आपण पूर्ततेकडे कसे नेऊ शकू, याची आखणी व कृती दोन्ही गोष्टी आपण करू शकतो. आफ्रिकन-अमेरिकन असलेले बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष कसे झाले, यामागे त्यांची वैचारिक ताकद खूप महत्त्वाची ठरते. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देशासाठी अनेक स्वप्नं आहेत, हे आपण सगळे जाणतो. पण, त्यांचा त्या पदापर्यंत पोहोचताना केलेला प्रवास अशक्यतेतून शक्यतेकडे करता येणाऱ्या प्रवासाचे मूर्तिमंत उदाहरण आहे. याशिवाय ‘स्वच्छ भारत’ या सुंदर अभियानाकडे त्यांनी शक्यतेच्या नजरेतून पाहिले म्हणून आज आपण त्या दिशेने एक सकारात्मक वाटचाल करत आहोत, ही खूप मोठी गोष्ट आपल्या देशासाठी आहे. हेन्री फोर्ड यांचे एक सुंदर वाक्य प्रचलित केले आहे - “Whether you think you can, or you think you can't – you're right.” म्हणून आपल्यालाच ठरवायचं आहे की, आपल्याला कशावर विश्वास ठेवायचा आहे. पसंद अपनी अपनी...
 

- डॉ. शुभांगी पारकर
 
 
Powered By Sangraha 9.0