हरित लवादाकडून 'हिंदुस्थान झिंक' ला २५ कोटींचा दंड

07 Feb 2022 15:27:14
                    
hindustan zinc
 
 
 
 
जयपूर: राष्ट्रीय हरीत लवादाकडून वेदांत समूहातील 'हिंदुस्थान झिंक' या कंपनीस २५ कोटींचा दंड ठोठावण्यात आला आहे. राजस्थानमधील भिलवाडा जिल्ह्यात या कंपनीकडून पर्यावरण नियमांचे उल्लंघन झाल्यामुळे ही कारवाई झाली आहे. या निकालानुसार 'हिंदुस्थान झिंक' या कंपनीस हा दंड तीन महिन्यांच्या आत भिलवाड्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे भरण्यास सांगितले आहे.
 
राष्ट्रीय हरित लवादाचे अध्यक्ष ए.के. गोयल यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने हा निकाल दिला आहे. या निकालात लवादाने असे स[ष्ट नमूद केले आहे की जेव्हा प्रश्न गरीब गावकऱ्यांचा आणि प्रकल्प प्रवर्तक कंपनीचा असतो. लवाद गरीब गावकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाकडे दुर्लक्ष करू शकत नाही. पर्यावरण कायद्यांना कमी लेखू नका असेही लवादाने स्पष्ट केले आहे. हुरडा तालुक्यातील सहाहून अधिक ग्रामपंचायतींना या पर्यावरण नियमांच्या उल्लंघनाचा फटका बसला आहे असे समोर आले आहे.
 
या क्षेत्रातील भूजल आणि मृदेची गुणवत्ता सुधारण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यास लवादाने सांगितले आहे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि भिलवाडाचे जिल्हाधिकारी यांची समिती स्थापन करून यासाठी योजना बनवण्यास सांगितली आहे. या समितीमध्ये पर्यावरण तज्ज्ञांचाही समावेश असावा असे लवादाने सांगितले आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0