'तेजोमय स्वर' अनंतात विलीन

06 Feb 2022 19:25:27
         
       
         
lata mangeshkar  
 
 
 
 
 
मुंबई: भारतरत्न, गानकोकिळा लता मंगेशकर यांच्यावर शिवाजीपार्क येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. अनेक दशके देशातल्या रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा 'तेजोमय स्वर' शांत झाला. सकाळी ११ वाजता त्यांचे पार्थिव त्यांचे निवासस्थान असलेल्या 'प्रभुकुंज' येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी चाहत्यांची रीघ लागली होती. दुपारी ४ वाजता त्यांची अंत्ययात्रा शिवाजीपार्कच्या दिशेने निघाली.
 
 
शिवाजीपार्क येथे पोचल्यावर  पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून लतादीदींना श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर वैदिक मंत्रघोषात त्यांच्या पार्थिव देहाला त्यांचे बंधू हृदयनाथ मंगेशकर यांनी मुखाग्नी दिला. त्यासमयी बंदुकीच्या छत्तीस फैरी झाडून लता दीदींना मानवंदना देण्यात आली.
 
शिवाजीपार्क येथे अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती. राज्यपाल कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यासह राजकीय, संगीत क्षेत्रासह अनेक क्षेत्रातील मान्यवरांनी लतादीदींना श्रद्धांजली अर्पण केली.
 
 
 
Powered By Sangraha 9.0