'जैसे थे' व्याजदराची शक्यता

05 Feb 2022 11:21:28
                                             
reserve bank
  
 
 
 
मुंबई: रिझर्व्ह बँकेची पतधोरण आढावा बैठक येत्या आठवड्यात होणार आहे. या बैठकीत व्याजदर 'जैसे थे' राहण्याची शक्यता आहे. कोरोना काळाच्या पार्श्वभूमीवर अर्थव्यवस्थेला गती येण्यासाठी केंद्र सरकारकडून भांडवली खर्चात मोठ्या प्रमाणावर वाढ करण्यात आली आहे. त्याचा परिणाम म्हणून महागाई वाढू शकते म्हणून असा जैसे थे व्याजदराचा निर्णय घेतला जाणार असल्याचा अंदाज आघाडीची विदेशी दलाली पेढी बँक ऑफ अमेरिका सिक्युरिटीज ने शुक्रवारी व्यक्त केला. येत्या सोमवार पासून या तीन दिवसीय पतधोरण आढावा बैठकीला सुरुवात होणार आहे.
 
देशाच्या अर्थसंकल्प सादरीकरणानंतर रोख्यांवरील परतावा दार वाढला आहे. जागतिक पातळीवरही अनेक देशांनी कोरोना संकटातून अर्थव्यवस्थेला बाहेर काढण्यासाठी आपला भान्डवली खर्च वाढवला आहे. त्याचाच परिणाम म्हणून अनेक देशांच्या मध्यवर्ती बँकांनी व्याजदर वाढवले आहेत किंवा अशी वाढ केली जाणार असल्याचे संकेत दिले आहेत. मात्र भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दर मे २०२० पासून ४ टक्केच ठेवला आहे. हा दार आता पर्यंतचा सर्वात नीचांकी दर आहे.
 
जगात इतर ठिकाणी व्याजदर वाढवले जात असताना रिझर्व्ह बँकेने मात्र आपले विकासासाठी मदतीचे धोरण कायमच ठेवले आहे. येत्या काळातही रेपो दर जैसे ठेच राहण्याची शक्यता आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0