चीनची परदेशी पत्रकारांवरही हुकूमशाही

05 Feb 2022 16:27:01
 
डच पत्रकार
 
नवी दिल्ली : हिवाळी ऑलिंपिक २०२२ हे चीनमधील बीजिंग येथे पार पडत आहे. या ऑलिम्पिकसाठी जगभरातील पत्रकार चीनमध्ये उपस्थित आहेत. पण साम्यवादी विचारसरणी मानणाऱ्या चीनमध्ये लोकशाही आणि माध्यमांचे स्वातंत्र्य मात्र नाही याचा अनुभव प्रत्येक क्षणाला येथील पत्रकारांना येताना दिसत आहे. बीजिंगमधील हिवाळी ऑलिम्पिकचे कव्हरेज करणाऱ्या एका डच रिपोर्टरला देखील असाच काहीसा अनुभव आला असल्याची माहिती समोर येत आहे. ऑलिम्पिक उद्घाटन समारंभाच्या थेट कव्हरिंग दरम्यान त्याला चिनी रक्षकाकडून जबरदस्ती पकडण्यात आले.
 
 
ही घटना शुक्रवारी (४ फेब्रुवारी २०२२) रोजी घडली आहे. डच पब्लिक ब्रॉडकास्टिंगचा वार्ताहर सोजर्ड डेन दास हा ऑलिम्पिक उद्घाटन समारंभादरम्यान थेट वार्तांकन करत असताना एका चिनी रक्षकाने त्यांना जबरदस्ती मागे ढकलले. या सर्व प्रकरणाचा व्हिडिओदेखील सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये चिनी रक्षक हातावर लाल पट्टी बांधून मुजोरी भाषेत काहीतरी बोलत असल्याचेहि दिसत आहे.
 
 
 
 
 
सोजर्ड डेन दासचा चिनी अधिकार्‍यांकडून झालेल्या छळाबद्दल एनओएस न्यूज जर्नलने म्हटले आहे की, “आमच्या बातमीदार सोजर्ड डेन दास यांना त्यांचे थेट वार्तांकन सुरू असताना सुरक्षा रक्षकांनी कॅमेरा बंद करण्यास लावला. दुर्दैवाने, चीनमधील पत्रकारांसाठी हे रोजचेच वास्तव होत चालले आहे. परंतु तरीही त्याने त्याचे वार्तांकन पूर्ण केले आहे." सोजर्ड डेन दास सोबत हि घटना नेस्ट स्टेडियमबाहेर घडली असून अमेरिकेनेही या घटनेनंतर आपल्या खेळाडूंना तेथील मानवाधिकार उल्लंघनाबाबत बोलू नका असा इशारा दिला आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0