हिंदुविरोधी वक्तव्यामुळं ओवेसींवर हल्ला! आरोपींची कबुली

04 Feb 2022 16:36:22

Owaisi






लखनऊ
: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूकांच्या प्रचारा दरम्यान ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे (AIMIM) प्रमुख असदुद्दीन ओवैसींच्या (Asadudin Owaisi) ताफ्यावर गोळीबार केल्या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली होती. अटक आरोपींपैकी एकावर पूर्वी कलम ३०७ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. ओवैसीच्या सुरक्षेचा विचार करता केंद्रीय गृहमंत्रालयानं त्यांना झेड सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, सुरक्षा स्वीकारण्यास त्यांनी नकार दिला आहे.


औवैसींवर हल्ल्या प्रकरणी युपीच्या एडीजी प्रशांत कुमार यांनी शुक्रवारी या संदर्भात पत्रकार परिषद सांगितले की, यातील एक आरोपी सचिन तर दुसऱ्याचे नाव शुभम असे आहे. दोघांविरोधात हत्येचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सचिन नोएडाच्या बादलपुरचा रहिवासी आहे. तो एलएलएमचा विद्यार्थी आहे. त्याची चौकशी सुरू आहे.

दूसरा आरोपी शुभम सहारनपुरचा राहणारा असून तो दहावी पास आहे. त्याची कुठलीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. दोघेही आरोपी पूर्वीपासूनच एकमेकांना ओळखतात. ओवेसींच्या हिंदूविरोधी वक्तव्यामुळे हा हल्ला केल्याचा दावा त्यांनी केला आहे. २०१३-१४मध्ये ओवैसींनी राम मंदिराविरोधात वक्तव्य केले होते. त्यामुळे दोघांनी हा हल्ला केला. दोघांकडून एक वाहन जप्त करण्यात आले आहे.





Powered By Sangraha 9.0