वीज प्रकरणी सरकारचे वरातीमागून घोडे

28 Feb 2022 13:58:22
                 
                   
nitin raut
 
 
मुंबई: रविवारी  मुंबई मध्ये सुमारे दीड तासासाठी वीजपुरवठा खंडित झाला होता. मुंबईची जीवनवाहिनी असलेली लोकल सेवासुद्धा या वीज झटक्याने थांबली. राज्य सरकारचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी आता या प्रकरणी उशिरा जाग येऊन उच्चस्तरीय चौकशी करणार असल्याचे जाहीर केले आहे. वीज वाहिन्यांच्या देखभालीची कामे चालू असताना अचानक ओढवलेल्या तांत्रिक बिघाडाने हा विजखोळंबा झाला असे ऊर्जा मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
 
 
मुंबईत वीज पुरवठा खंडित होण्य्ची ही दुसरी वेळ आहे. ऑक्टोबर २०२० मध्येही अशाच प्रकारचा वीज खोळंबा झाला होता. "सरकार या मागे झालेल्या तंत्रिक बिघाडातून काहीच शिकलेली नाही. असे प्रकार घडणे हे व्यवस्थेचे तसेच ऊर्जा मंत्र्यांचे अपयश आहे" अशा शब्दांत भाजपचे नेते विश्वास पाठक यांनी सरकारवर टीका केली आहे.
 
 
                     
                       
 
 
 
Powered By Sangraha 9.0