हेमंत नगराळेंची बदली; संजय पांडेची आयुक्तपदी निवड

28 Feb 2022 17:46:55

Sanjay Pandey
मुंबई : मुंबई पोलीस दलात राज्य सरकारकडून मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. राज्याचे पोलीस महासंचालकपदी असलेल्या संजय पांडे यांची मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर हेमंत नगराळे यांची उचलबांगडी करण्यात येत असून महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
 
 
मुंबईच्या पोलिस आयुक्तपदावर नियुक्ती झालेले पांडे यांनी महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक पदाची जबाबदारी होती. मात्र, त्यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी रजनीश शेठ यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी राज्य सरकारवर नाराजी व्यक्त केली होती. मात्र, आता राज्य सरकारने त्यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती केली आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0