पंतप्रधानांनी दिल्या 'मराठी'तून शुभेच्छा!

28 Feb 2022 09:50:35
 
Narendra Modi
 
 
 
नवी दिल्ली : रविवार, दि. २७ फेब्रुवारी रोजी मराठी राजभाषा दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील मराठी बांधवांना शुभेच्छा दिल्या. यावेळी आयोजित केलेल्या मन की बात या आकाशवाणीवरील कार्यक्रमात ते बोलत होते. त्याचबरोबर ज्येष्ठ साहित्यिक कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांनी अभिवादनही केले. यादरम्यान ते मराठीतून बोलत होते. 

  
"आज मराठी भाषा गौरव दिवस आहे. सर्व मराठी बंधु-भगिनिंना मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! हा दिवस मराठी साहित्यिक विष्णू वामन शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांनी समर्पित आहे. त्यांनी मराठीतून अनेक कविता लिहिल्या, नाटक लिहिले, मराठी साहित्याला एका उंच शिखरावर नेऊन ठेवलं आहे.", असे पंतप्रधानांनी म्हटले.   

 
 
 
 
Powered By Sangraha 9.0