सैनिकांसाठी 'शहीद' व 'हुतात्मा' शब्द वापरता येणार नाहीत!

भारतीय लष्कराने शहीद किंवा हुतात्मा शब्दांचा वापर चुकीचा असल्याचे म्हंटले

    28-Feb-2022
Total Views |

Indian Army
नवी दिल्ली : युद्धात मृत्युमुखी पडणाऱ्या सैनिकांसाठी ‘शहीद’ किंवा ‘हुतात्मा’ शब्दांचा वापर करणे चुकीचे आहे. भारतीय लष्कराने लिहिलेल्या पत्रामध्ये सांगितले आहे की, "सैन्याच्या काही अधिकार्‍यांकडून, तसेच प्रसारमाध्यमांकडून सैनिकांसाठी ‘शहीद’ शब्दाचा वापर केला जातो. ज्यांनी देशासाठी बलीदान दिले आहे. ज्या व्यक्तीने धर्मिक किंवा राजकीय आस्था, विचारांसाठी प्राण गमावले आहेत, अशा व्यक्तींसाठी ‘शहीद’ किंवा ‘हुतात्मा’ हा शब्द वापरला जातो. त्यामुळे भारतीय सैनिकांसाठी ‘शहीद’ शब्दाचा वापर करणे चुकीचे आहे."
 
भारतीय लष्कराकडून वीर सैनिकांसाठी पुढील शब्द वापरण्याची सूचना देण्यात आल्या आहेत,
 
 
१. किल्ड इन अ‍ॅक्शन (कारवाईत मारले गेले)
२. लेड डाउन देअर लाइफ (प्राणांचे बलीदान केले)
३. सुप्रिम सेक्रिफाइस फॉर नेशन (देशासाठी दिले सर्वोच्च बलीदान)
४. फॉलन हीरोज (वीरगतीला प्राप्त)
५. इंडियन आर्मी ब्रेव्स (भारतीय सेनेचे वीर)
६. फॉलन सोल्जर्स (युद्धात कामी आले)