ठाकरेंकडून गोडवे 'मराठी'चे; मात्र लोकार्पण 'इंग्रजी' शाळेचे !

28 Feb 2022 13:35:17

aditya
 
 
मुंबई : मुंबईतील मानखुर्द येथील महाराष्ट्रनगर परीसरात महापालिकेच्या मुंबई पब्लिक स्कूल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेचे २७ फेब्रुवारी रोजी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. मराठी राजभाषा दिनाच्या शुभ मुहूर्तावर या शाळेचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी एकुण ४१६ विद्यार्थ्यांनी या शाळेत प्रवेश घेतला.
 
एकीकडे मराठी भाषा टिकून रहावी यासाठी महाराष्ट्रातील आणि विशेषत: मुंबईतील विद्यार्थ्यांनी मराठी भाषेतून शिक्षण घेण्याची आवश्यकता आहे. गेल्या १० वर्षात मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांच्या संख्येत कमालीची घट झाली आहे. त्यामुळे महापालिकेच्या अनेक शाळा सध्या बंद पडण्याच्या उंबरठ्यावर उभ्या आहेत. असे असूनही इंग्रजी शाळांचे उद्घाटन करणे म्हणजे मराठी शाळांना ताळे लावण्यासाठीचे महत्त्वपूर्ण पाऊल म्हणावे लागेल.
 
दरम्यान, या शाळेच्या उद्घाटन प्रसंगी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंसह खासदार राहूल शेवाळे व इतर शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आदित्य ठाकरे यांनी बोलताना मराठी भाषा टिकून राहावी यासाठी मराठी भाषा शिकवणे सक्तीचे केले असल्याचे मत व्यक्त केले.
 
Powered By Sangraha 9.0