युक्रेनच्या मदतीला एलॉन मस्क

27 Feb 2022 18:40:48
         
                     
elon musk
 
 
 
नवी दिल्ली: रशिया-युक्रेन युद्धात रशियाने युक्रेनवर चारही बाजूंनी चढाई केली आहे. रशियाच्या हल्ल्यांमध्ये युक्रेनची संपर्क यंत्रणा बेचिराख झाली होती. याच वेळी युक्रेनच्या डिजिटल टान्सफॉर्मशन मंत्र्यांनी स्वतः ट्विट करून एलोन मस्क यांना मदतीची विनंती केली होती. युक्रेनच्या मदतीच्या आवाहनाला मस्क यांनी सकारात्मक प्रतिसाद देत आपल्या स्पेसएक्स कंपनीची 'स्टारलिंक' ही सेवा देण्याचे मान्य केले. शनिवारीच ही सेवा युक्रेन मध्ये कार्यरत झाली असल्याचे मस्क यांनी सांगितले आहे.
 
 
 
“तुम्ही मंगळ ग्रहावर वसाहत तयार करण्याचा प्रयत्न करत असताना इथे रशिया युक्रेनवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. तुमचे रॉकेट यशस्वीपण अंतराळात स्थिरावत असताना रशिया युक्रेनच्या नागरिकांवर हल्ला करत आहे. आम्ही युक्रेनला तुमच्या स्टारलिंक स्टेशनची सेवा देण्याची विनंती करतो.” अशा शब्दांत युक्रेनच्या मंत्र्यांनी मस्क यांना विनंती करताना म्हटले आहे. युक्रेनची संपर्क यंत्रणा उद्धवस्त झाल्याने युक्रेनचा बाहेरच्या जगाशी संपर्कच तुटला असता. त्यामुळे ही सेवा पूर्ववत होणे युक्रेनसाठी महत्वाचे होते. २००० उपग्रहांच्या माध्यमातून संपूर्ण पृथ्वीवर इंटरनेट सेवा पुरवणे हे स्पेसएक्सच्या स्टारलिंक उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0