एसटी विलानीकरणाला आणखी विलंब; संप सुरूच राहणार

26 Feb 2022 16:52:29

ST Bus
 
 
मुंबई : गेली ४ महिने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची विविध मागण्यांसाठी राज्यभर आंदोलन सुरु आहेत. यामध्ये एसटी महामंडळाचे राज्य सरकरमध्ये विलीनीकरण व्हावे ही महत्वाची मागणी करण्यात येत आहे. शुक्रवारी उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीतही एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा निघाला नाही. राज्य सरकारचा विलीनीकरणाबद्दलचा अहवाल जाहीर करण्यासाठी मंत्रिमंडळाची परवानगी आवश्यक आहे, असे सरकारकडून सांगण्यात आले. त्यासाठी आता दोन आठवड्यांचा अवधी मंजूर करत खंडपीठाने सुनावणी ११ मार्चपर्यंत तहकूब केली.
 
 
एकीकडे एसटी संपकरी आणि राज्य सरकार यांच्यातील तिढा सतत नाही आहे. तर, दुसरीकडे अनेक महिने पगारच नसल्याने काही एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. उस्मानाबादमध्ये हनुमंत चंद्रकात आकोसकर या एसटी कर्मचाऱ्याने शनिवारी आत्महत्या केली. ते तुळजापूर डेपोमध्ये वाहक म्हणून काम करत होते. विलीनीकरणासाठी पुकारलेल्या आंदोलनात त्यांनी पहिल्या दिवसापासून सहभाग घेतला होता. आंदोलनादरम्यान कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविण्यासाठी ते रोजंदारी काम करत होते .आंदोलनाला शंभर दिवस उलटले तरी मार्ग निघत नसल्याने ते गेल्या काही दिवसांपासून नैराश्यात होते.
 
 
Powered By Sangraha 9.0