मुंबई : आयपीएल २०२२च्या सर्व सामन्यांचे नियोजन हे मुंबईसह पुण्यातील मैदानावर होणार आहेत. याबाबत बीसीसीआयने अधिकृतरित्या जाहीर केल्यानंतर शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी केलेल्या 'महाराष्ट्रात आपले स्वागत आहे' या ट्विटची चांगलीच चर्चा रंगली.
त्यांनी केलेल्या या ट्विटनंतर नेटकऱ्यांनी मात्र त्यांच्यावर प्रश्नाचा पाऊस पद्लायचे दिसून आले. अनेकांनी याचे स्वागत केले, तर काहींनी यावर टीकादेखील केली.
एका युझरने प्रश्न उपस्थित केला की, "आयपीएल जर महाराष्ट्रात होणार असेल तर सामन्यांचे समालोचन मराठीत होणार का? महाराष्ट्र हवा, मराठीबाजारपेठ हवी, पण राज्यभाषा मराठी नको, असे का?" असा खोचक प्रश्न विचारण्यात आला. कारण, नुकतेच आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी उत्तर प्रदेशच्या रॅलीमध्ये मराठी आणि महाराष्ट्रातील उत्तर भारतीयांवर केलेल्या वक्तव्यांवरून वादंग निर्माण झाला होता.
बीसीसीआयने ही घोषणा केल्यानंतर दुसऱ्या दिवशीच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी वानखेडे स्टेडीयमला भेट दिली. यावरून त्यांनी ट्विट केल्यानंतर अनेकांनी या गोष्टीवरून संताप व्यक्त केला. मुंबईकरांचे, महाराष्ट्राचे एवढे प्रश्न प्रलंबित असताना आदित्य ठाकरे यांची वानखेडे स्टेडीयमची भेट पटते का? असा प्रश्न काही युझर्सनी विचारला.