अमृता फडणवीसांबद्दल आक्षेपार्ह व्यक्तव्य ; राष्ट्रवादीच्या नेत्यावर गुन्हा दाखल

26 Feb 2022 17:27:50

NCP
मुंबई : भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष अशोक गावडे यांनी अक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यानंतर भाजपच्या आमदार मंत्रा म्हात्रे आणि प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. आता भाजप व युवा मोर्चा कार्यकर्ते आक्रमक झाल्याने पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे आता त्यांच्या अडचणीत चांगलीच वाढ होणार आहे.
 
 
भाजपच्या जिल्हाध्यक्ष दुर्गा डोख यांनी केलेल्या तक्रारीनुसार अशोक गावडे यांच्यावर कलम ५०९ अंतर्गत गुन्हा दाखल करणायत आला. नवी मुंबई भाजपने स्त्री वर्गाचा अपमान केल्याच्या निषेधार्थ गावडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल होईपर्यंत संघर्ष करण्याची भूमिका घेतली होती. तसेच गावडे यांनी आपल्या वक्तव्याबाबत माफी मागावी अन्यथा त्यांना नवी मुंबईत महिला फिरू देणार नाही, असा इशारा भाजपच्या आमदार मंत्रा म्हात्रे इशारा दिला होता.
 
 
Powered By Sangraha 9.0