रशियानं शांतता राखावी : तालीबान

25 Feb 2022 17:45:26

Taliban




काबुल  ukraine russia war : अफगाणिस्तानावर दहशतीने कब्जा करणाऱ्या तालीबाननेही आता युक्रेनसाठी भूमिका घेतली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्‍लादिमीर पुतिन यांना याबद्दल सल्ला दिला आहे. तालिबानने म्हटल्या प्रमाणे, दोन्ही बाजूंनी संयम ठेवावा. ज्यामुळे हिंसाचार बळावेल, अशा गोष्टी करु नका. विशेष म्हणजे बंदुकीच्या गोळीने कब्जा अफगाणिस्तानवर करणाऱ्या तालीबान्यांनी युक्रेन-रशियाला चर्चेने प्रश्न सोडवा, असे म्हटले आहे.  ukraine russia war



तालीबानने म्हटल्यानुसार, या संपूर्ण प्रकरणावर आम्ही लक्ष ठेवून आहोत. आम्ही तिथल्या नागरिकांच्या झालेल्या मृत्यूमुळेही चिंतित आहोत. हे संकट संपूर्णपणे शांतता पूर्ण परिस्थितीत हाताळायला हवे." अवघ्या काही महिन्यांपूर्वीच तालीबानने अफगाणिस्तानवर कब्जा केला होता. त्यानंतर तिथली सत्ता बळकावली होती. त्यात मोठ्या संख्येने अफगाणिस्तानचे सैनिक मारले गेले. त्यानंतर असे वक्तव्य भूवया उंचावणारे आहे.


या दरम्यान, यूक्रेनचे राष्ट्रपती वलोडिमिर जेलेंस्की म्हणाले की, "रशियाचे सैनिक चेरनोबिल परमाणु ऊर्जा संयंत्रावर कब्जा मिळवल्यानंतर युक्रेनची सत्ता उद्धवस्त करण्यावर ठाम आहेत. ९६ तासांमध्ये ते यावर कब्जा करतील." दरम्यान, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री एंटनी ब्लिंकन यांनीही याला दुजोरा दिला आहे.


Powered By Sangraha 9.0