मोदी-पुतीन चर्चेत नेमकं काय घडलं?

25 Feb 2022 12:53:55

modi putin
 
 

नवी दिल्ली : रशिया आणि युक्रेन मध्ये सध्या युद्ध परीस्थिती निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात फोनवरून संवाद झाला आहे. यादरम्यान पुतीन यांनी मोदींना युक्रेनमधील परीस्थितीची माहिती दिली असल्याचे समोर आले आहे.

 

पंतप्रधान मोदींनी हिंसाचार त्वरित थांबवण्याचे आवाहन पुतीन यांना केले आहे. सोबतचं, राजनयिक वाटाघाटी आणि संवादाच्या मार्गावर परत येण्यासाठी सर्व बाजूंनी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन केले आहे. त्याचबरोबर रशिया आणि नाटो यांच्यातील मतभेद संवादानेच सोडवले जाऊ शकतात या दीर्घकालीन विश्वासाचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला.

 

पंतप्रधान मोदींनी रशियाचे अध्यक्ष पुतीन यांना युक्रेनमधील भारतीय नागरिकांच्या, विशेषत: विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत भारताच्या चिंतेबद्दल अवगत केले. शिवाय भारत त्यांच्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढणे आणि भारतात परतण आणणे याला सर्वोच्च प्राधान्य देत असल्याचंही सांगितले. शेवटी पंतप्रधान मोदी आणि अध्यक्ष पुतिन यांचे, दोन्ही देशांचे अधिकारी आणि राजनैतिक मुत्सद्दी प्रादेशिक हितसंबंधांच्या मुद्द्यावर नियमित संपर्क ठेवतील यावर एकमत झाले.

 
Powered By Sangraha 9.0