बीडीडी चाळीतील रहिवासी आणि पोलिसांमध्ये संघर्ष

24 Feb 2022 12:42:02

BDD police
 
 
मुंबई : मुंबईतील सर्वाधिक चर्चित प्रकल्पांपैकी एक असलेल्या बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. लोअर परेलच्या डिलाईल रोड भागातील बीडीडी चाळ रहिवासी आणि पोलीस प्रशासनामध्ये बुधवार, दि. २३ फेब्रुवारी रोजी कडवा संघर्ष झाल्याचे दिसून आले. बीडीडी चाळ भागातील मैदानाचा ताबा घेण्यावरून पोलिस आणि संबंधित प्रशासनामध्ये मोठा वाद झाला आहे. बीडीडी चाळ परिसरात मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेल्या पोलीस बंदोबस्तामुळे परिसरात तणावपूर्ण शांतता निर्माण झाली होती.
 
 
प्रशासनाच्या कारवाईला विरोध करणार्‍या आंदोलकांची धरपकड देखील करण्यात आली. दरम्यान, पोलीस आणि संबंधित प्रशासनाच्या कारवाईला विरोध करणार्‍या स्थानिक रहिवाशांना पोलीस प्रशासनातर्फे काही काळासाठी अटक करण्यात आली होती. यावेळी स्थानिक रहिवाशांनी पोलीस कारवाई संदर्भात दै. ‘मुंबई तरुण भारत’कडे आपल्या भावना व्यक्त केल्या.
 
Powered By Sangraha 9.0