सोन्याचे भाव चढेच, रुपया घसरला, तेल महागले

24 Feb 2022 18:02:05
                              
   
rusia-ukraine
 
 
 
मुंबई: रशिया-युक्रेन युद्धाच्या भीतीने सर्व जगावर अनिश्चिततेचे वातावरण पसरले आहे. भारतीय अर्थव्यवस्थेवरही याचे परिणाम दिसत आहेत. बाजारात पसरलेल्या अनिश्चिततेने सोन्यातील गुंतवणूक वाढायला लागली असून परिणामी सोन्याचे भाव वाढतच आहेत. बाजारात सध्या एक टोला सोन्याचा भाव १,१८२ रुपयांनी वाढून ५१,५६१ वर पोचला आहे. चांदीचे भाव सुद्धा वाढतच आहेत. बाजरात सध्या एक किलो चांदीचा भाव १५८३ रुपयांनी वाढून ६६,१६८ रुपयांवर जाऊन पोचला आहे.
 
 
रुपया घसरला
जगभर पसरलेली युद्धाची छाया आणि त्याचाच परिणाम म्हणून उसळलेल्या महागाईने रुपयाच्या किमतीत जबरदस्त घसरण दिसून येते आहे. गुरुवारी डॉलरच्या तुलनेत रुपया ५५ पैश्यांनी घसरला. आता एका डॉलरमागे ७५.१६ रुपये मोजावे लागतील.
 
 
खनिज तेलाने १०० डॉलरचाच टप्पा ओलांडला
गुरुवारी जागतिक बाजारात खनिज तेलाने १०० डॉलर्स चा टप्पा ओलांडला. खनिज तेलाची प्रती बॅरल किंमत आता १०५ डॉलर झाली आहे. २०१४ पासून प्रथमच खनिज तेलाने १०० डॉलर्सचा टप्पा ओलांडला आहे. रशिया हा नैसर्गिक वायू आणि खनिज तेलाचा प्रमुख पुरवठादार असल्याने जागतिक बाजारात खनिज तेलाच्या किमती पुढचे काही दिवस चढ्याच राहतील असे जगभरातील तज्ज्ञांचे मत आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0