राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री यांचा 'द काश्मीर फाइल्स' हा आगामी चित्रपटावर सध्या सर्वत्र मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरु आहे. चित्रपटाच्या ट्रेलरला इंटरनेटवर प्रचंड लोकप्रियता मिळाली. अग्निहोत्रीचा शेवटचा चित्रपट द ताश्कंद फाइल्स होता, जो माजी पंतप्रधान स्वर्गीय लाल बहादूर शास्त्री यांच्या मृत्यूवर आधारित होता. या चित्रपटाला तथाकथित कट्टरतवाद्यानी आणि चित्रपट समीक्षकांच्या टोळीने लक्ष्य केले होते. विवेक अग्निहोत्री यांनी त्यांच्या आगामी चित्रपटाला समीक्षक अनुपमा चोप्राने नुकसान पोहचवल्याचा आरोप केला आहे.
विवेक अग्निहोत्रीने बुधवारी (२३ फेब्रुवारी) फिल्म कंपेनियनच्या प्रमुख अनुपमा चोप्रा यांच्या विरोधात ट्विट केले आणि आरोप केला की, ती त्यांच्या चित्रपटाला लक्ष्य करण्यासाठी काही 'डर्टी ट्रिक' खेळत आहे. अनुपमाला 'शूर्पणखा' म्हणत विवेक अग्निहोत्रीने विचारले कि, "तुमच्यात हिम्मत असेल, तर 'द काश्मीर फाइल्स'ला जे काही नुकसान पोहचवायचंय ते उघडपणे पोहचवा. कृपया पाठीमागून घाणेरडे कृत्य करणे थांबवा. तुमची पात्रता एवढीच आहे की तुम्ही एका निर्मात्याशी लग्न केले आहे ज्याने केपी (काश्मिरी पंडित) असूनही केपीच्या पाठीत खंजीर खुपसला आहे."
जेव्हा ट्विटरवरील एका युजरने विचारले समीक्षक अनुपमाने असे काय म्हटले आहे तेव्हा चित्रपट निर्माते विवेक अग्निहोत्री म्हणाले की ते लवकरच अनुपमा चोप्रा आणि तिच्या टीमकडून वापरण्यात आलेल्या डर्टी ट्रिक्स उघड करतील. अग्निहोत्री यांनी चोप्राच्या फिल्म कंपेनियनमध्ये काम करणाऱ्या कथित चित्रपट समीक्षक आणि लेखक राहुल देसाई यांनाही लक्ष केलं. हे चित्रपटाचे समीक्षण हे फक्त मोफत मिळणाऱ्या फ्राईज आणि बर्गरसाठीच करतात असेही विवेक अग्निहोत्रींनी म्हटले आहे.