शिवसेनेचा खोटा पर्यावरणवादी चेहरा उघड; शिवाजी पार्कची दैना

23 Feb 2022 13:16:20
                     bmc
 
 
 
मुंबई: शिवाजी पार्क मध्ये बांधल्या जाणाऱ्या रस्त्यासाठी सल्लागाराची सल्ला धुडकावून खडी आणि मातीचा वापर होत असल्याचे उघड झाले आहे. शिवाजी पार्क मध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग साठी पालिकेने नंदन मुणगेकर यांची सल्लागार म्हणून नियुक्ती केली होती. यातून पालिकेचा खोटा पर्यावरणवादी चेहरा उघड झाला आहे. "मैदानातील रस्त्यासाठी खडी आणि माती वापरली तर या रेन वॉटर हार्वेस्टिंग साठी अडथळा निर्माण होईल म्हणून यांचा वापर त्या रस्त्यासाठी करू नये" असा सल्ला मुणगेकर यांनी पालिकेला दिला होता. त्याच संदर्भात त्यांनी जी- उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्तांना पात्र पाठवून कळवले होते.
 
 
मुणगेकर यांची पालिकेने मैदानातील रेन वॉटर हार्वेस्टिंग साठी सल्लागार म्हणून नेमणूक केली आहे. या प्रकल्पासाठी कोणत्या जलवाहिन्या कुठे बसवाव्यात, यासाठी लागणाऱ्या विहिरीच्या जागा कुठे असाव्यात, त्यांची खोली किती असावी यांचा आराखडा मुणगेकर यांनी बनवून दिला आहे. मुणगेकर यांनी सहाय्यक आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात मैदानात खडी किंवा माती वापरल्यास, पाणी झिरपण्यास अडथळा तयार होऊन पाणी झिरपणार नाही असे सांगितलेत आहे. तरीसुद्धा पर्यावरणास हानिकारक घटक वापरून मैदानाचे नुकसान करण्याचा प्रयत्न पालिकेकडून होतो आहे.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0