मी हिजाब समर्थक, मी ईस्लामसाठी बॉलीवूड सोडतेयं : महजबी सिद्दिकी

23 Feb 2022 16:47:42
 

mehjabi 
 
 
मुंबई : कर्नाटकातील शिवमोंगा येथून सुरु झालेला हिजाब वाद आता संपूर्ण देशात पेटून उठला आहे. या वादाचे पडसाद बोललीवूडमध्येही उमटत असल्याचे दिसत आहे. जायरा वसीमच्या पाठोपाठ आता 'बिग बॉस ११' मध्ये दिसलेली महजबी सिद्दिकी हिने देखील हिजाबचं समर्थन करत आपल्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ''मी हिजाबचं समर्थन करत आहे. मी ईस्लाम धर्मासाठी बॉलीवूडला सोडत आहे. मी अल्लाहच्या मार्गावर यापुढे चालेन'' असे महजबीने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
 
महजबी सिद्दिकीनं पोस्टमध्ये लिहिले आहे की,''मी हे यासाठी लिहित आहे कारण दोन वर्षांपासून मी खूप टेन्शनमध्ये होती, आणि मला काहीच समजत नव्हते की मी असे काय करू, जेणेकरून मला शांती मिळेल...अल्लाहच्या विरोधात जाऊन कधीच कोणी माणूस सुखी राहू शकला नाही. तुम्ही लोकांना खूश ठेवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ते कधीच मनापासून खूश राहू नाही शकत. त्यापेक्षा आपल्या वागण्याने अल्लाहला आनंद मिळेल अशीच गोष्ट करणे कधीही उत्तम. मी सोशल मीडियावर सना खानला एक वर्षापासून फॉलो करत आहे. मी तिने आत्मसात केलेल्या विचारांनाही फॉलो करत आहे. आणि तसं केल्यामुळे मला आनंद आणि समाधान मिळत आहे, अल्लाह मला अशाच सन्मार्गावर चालत राहण्याची सदबुद्धी देवो.''
 
यापूर्वी ईस्लाम धर्मासाठी सना खान आणि जायरा वसीम यांनी ग्लॅमर वर्ल्डपासून लांब जाण्याचा निर्णय घेतला होता. एकेकाळी बोल्ड ड्रेसेसमध्ये दिसणारी सना आता मात्र आपल्याला हिजाब मध्येच दिसून येते. तसेच जायरा वसीमने देखील ''ईस्लाम धर्मात हिजाब स्त्रियांसाठी चॉइस नाही तर ड्युटी आहे'' असं म्हणत हिजाबचं समर्थन केलं होत. परंतु पूर्ण देशात हिजाब वरुन सुरू असलेला वाद कळीचा मुद्दा बनत आहे. आणि अश्यावेळेसच हि सर्व वक्तव्य नेमकी समोर येत आहेत. त्यामुळे या नवनवीन वक्तव्यांमुळे हा वाद आणखीन चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत .
Powered By Sangraha 9.0