‘मराठी तरुण बदलतोय’ हा ‘स्टार्टअप’ विशेष कार्यक्रम उत्साहात

23 Feb 2022 12:26:46

STARTUP
 
मुंबई: ‘युनायटेड मराठी इंटरनॅशनल चेंबर ऑफ कॉमर्स’ (युएमआयसीसी/युमिक) आणि मराठी साहित्य संस्कृती व कला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने शिवजयंतीच्या निमित्ताने ‘मराठी तरुण बदलतोय’ हा ‘स्टार्टअप’ विशेष, आगळावेगळा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सुभाष कुलकर्णी यांनी मराठी साहित्य व कला मंडळच्या वाटचालीचा आढावा देऊन कार्यक्रमाची सुरुवात केली. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ‘बीएसई’चे संचालक शंकर जाधव उपस्थित होते. त्यांनी उद्योगात काय करावे आणि काय मागे ठेवावे, याचे मार्गदर्शन केले.माजी मंत्री सुरेश प्रभू यांनी व्हिडिओद्वारे आपल्या शुभेच्छा आणि तरुण वर्गाला उद्योगात येण्याचे आवाहन केले.
 
 
‘युमिक’च्या या कार्यक्रमात, ‘पवित्रक’ संस्थेचे संचालक, अंजीररत्न समीर डोंबे पाटील, ‘मी खादी’ संस्थेचे संचालक डॉ. सचिन पाटील आणि ‘नाशिक रेस्ट्रो कल्स्टर’चे संचालक वेदांशू पाटील, हे विशेष व्यक्ते म्हणून उपस्थित होते. मंदार नार्वेकर यांनी सूत्रधार म्हणून संपूर्ण कार्यक्रमाची सूत्रे सांभाळली आणि अ‍ॅड. शिवांगी झरकर यांनी ‘युएमआयसीसी’च्या भविष्यातील कार्यक्रमाचा आढावा सादर करून, प्रमुख वक्तांच्या मुलाखती घेतल्या. ओंकार भोवर यांनी तरुण उद्योजकांनी ‘युएमआयसीसी’ का ‘जॉईन’ करावे, याबद्दल सखोल माहिती दिली. कार्यक्रमाच्या शेवटी दिलीप जांभळे यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाचा समारोप घेतला.
 
Powered By Sangraha 9.0