पुष्पा : द राइज सर्वोत्कृष्ट चित्रपट तर रणवीर सिंह ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता

21 Feb 2022 16:19:00
 

pushpa 
 
 
मुंबई : चित्रपट सृष्टीतील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दादासाहबे फाळके आंतरराष्ट्रीय पुरस्काराची कलाकारांसह प्रेक्षकांनाही प्रतीक्षा लागून असते. यंदाचा या पुरस्काराचा सोहळा रविवारी म्हणजेच २० फेब्रुवारी २०२२ रोजी पार पडला. चित्रपट सृष्टीमध्ये आपले उत्कृष्ट योगदान दिल्याबद्दल अभिनेत्री आशा पारेख यांना गौरवण्यात आले. तर पुष्पा : द राइज या चित्रपटाला या वर्षातील सर्वत्कृष चित्रपट म्हणून गौरवण्यात आले. यावर्षीचा सर्वोकृष्ट अभिनेता रणवीर सिंह ठरला तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या पुरस्काराची मानकरी क्रिती सॅनॉन ठरली.
 
 
View this post on Instagram

A post shared by Dadasaheb Phalke -DPIFF Awards (@dpiff_official)

" /> 
दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार विजेत्यांची यादी
चित्रपट उद्योग सर्वोत्कृष्ट योगदान – आशा पारेख
फिल्म ऑफ दी इअर – पुष्पा – दी राईज
सर्वोत्कृष्ट चित्रपट – शेरशाह
सर्वोत्कृष्ट अभिनेता – रणवीर सिंह
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – क्रिती सेनॉन
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – केन घोष
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – सतिश कौशिक
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – लारा दत्ता
सर्वोत्कृष्ट खलनायक – आयुष शर्मा
समीक्षक सर्वोत्कृष्ट चित्रपट – सरदार उधम
समीक्षक सर्वोत्कृष्ट अभिनेता – सिद्धार्थ मल्होत्रा
समीक्षक सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – कियारा अडवाणी
पिपल्स चॉईस सर्वोत्कृष्ट अभिनेता – अभिमन्यू दासानी
पिपल्स चॉईस सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – राधिका मदन
बेस्ट डेब्यू – अहान शेट्टी
सर्वोत्कृष्ट आंतराष्ट्रीय फिचर फिल्म – अनदर राऊंड
सर्वोत्कृष्ट वेबसिरिज – कॅंडी
सर्वोत्कृष्ट वेबसिरिज अभिनेता – मनोज वाजपेयी
सर्वोत्कृष्ट वेबसिरीज अभिनेत्री – रविना टंडन
टेलीव्हिजन सिरिज ऑफ दी इअर – अनुपमा
टीव्ही मालिका सर्वोत्कृष्ट अभिनेता – शाहीर शेख
टीव्ही मालिका सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – श्रद्धा आर्या
मोस्ट प्रॉमिसिंग अभिनेता टीव्ही मालिका – धीरज धूपर
मोस्ट प्रॉमिसिंग अभिनेत्री टीव्ही मालिका – रुपाली गांगुली
सर्वोत्कृ्ष्ट लघूपट – पौली
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक – विशाल मिश्रा
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका – कनिका कपूर
Powered By Sangraha 9.0