विशाखापट्टणम : सोमवार, दि. २१ फेब्रुवारी रोजी विशाखापट्टणम येथे नौदलाकडून 'प्रेसिडेंट फ्लीट रिव्ह्यू-२०२२' हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे उपस्थित होते. यावेळी त्यांनी नौदलाच्या ताकदीचा एकूण आढावा घेतला. प्रत्येक राष्ट्रपतींच्या कार्यकाळात एकदा तरी हा कार्यक्रम नौदलाकडून आयोजित केला जातो. यावर्षीच्या कार्यक्रमात ६३ युध्दनौका,५० लढाऊ विमाने आणि काही पाणबुड्यांचाही समावेश करण्यात आला होता. भारतीय बनावटीच्या आयएनएस सुमित्रा या दस्तनौकेवरून राष्ट्रपतींनी कार्यक्रमाचा आढावा घेतला.