नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जगातली सर्वात मोठी लसीकरण मोहीम देशात यशस्वीपणे सुरू आहे. यात जानेवारी २०२२ पासून १५-१८ वर्षे वयोगटातील तरुणांचाही समावेश करण्यात आला होता. विशेष म्हणजे हैदराबादच्या 'बायोलॉजिकल ई' या कंपनीने तयार केलेल्या 'कॉर्बेवॅक्स' (Corbevax) या लसीला औषध नियामक प्रशासनाने (डीसीजीआयने) सोमवार, दि. २१ फेब्रुवारी रोजी आपत्कालीन मान्यता दिली आहे. यामुळे भारतातील १२ ते १८ वर्षांतल्या मुलांच्या लसीकरणाला वेग येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.