मुंबईत २५७ झुणका-भाकर केंद्र, २८ निष्कासित, ६ बंद

निवडणुकीपूर्वी महापौरांनी घेतला आढावा

    19-Feb-2022
Total Views |

bmc zunka bhakar
 
 
मुंबई : मुंबईत सध्या २५७ झुणका भाकर केंद्र असनू, २८ निष्कासित आणि ६ बंद झाली आहेत. या पार्श्वभूमीवर आणि निवडणुकीचे वारे वाहत असताना महापौर किशोरी पेडणेकर यांनी या केंद्रांचा आढावा घेतला.
 
मुंबईतील झुणका - भाकर केंद्र हे ‘अन्नदाता आहार’ केंद्रामध्ये परावर्तित करावी आणि बंद असलेली जास्तीत जास्त केंद्र कशी सुरु करता येतील, याबाबत मुंबईचे अतिरिक्त पालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांच्या उपस्थितीत १८ फेब्रुवारी रोजी प्राणिसंग्रहालयातील पेंग्विन सभागृहात ऑनलाइन आढावा बैठक घेतली.
 
या सर्व केंद्र संचालकांची कागदपत्रे तपासून वारसाहक्काने त्यांना कसे देता येईल, याची पडताळणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले. जागेची अडचण असल्यामुळे पालिकेच्या जागेव्यतिरिक्त राज्य शासनाची जागा उपलब्ध होऊ शकेल का, याचा अहवाल येत्या गुरुवारपर्यंत सर्व संबंधित सहाय्यक आयुक्तांनी अतिरिक्त आयुक्तांद्वारे सादर करावेत,असे महापौर म्हणाल्या. या संपूर्ण विषयाबाबत तांत्रिक बाजू तपासून संपूर्ण अहवाल सादर करणार आहे, असे काकाणी यांनी सांगितले.