संविधान नाही आम्ही कुराण मानतो

19 Feb 2022 13:16:44

kuran


गांधीनगर : १८ फेब्रुवारी २०२२ रोजी अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात विशेष न्यायालयाने ३८ दहशतवाद्यांना फाशीची शिक्षा सुनावली. तसेच ११ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. या दहशतवाद्यांच्या बचावासाठी जमियत उलेमा-ए-हिंद पुढे आले आहे. त्यांच्यासाठी उच्च न्यायालयात कायदेशीर लढा लढणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्याचवेळी या स्फोटाचा मास्टरमाईंड सफदर नागोरी याने राज्यघटनेपेक्षा कुराणचे महत्व अधिक असल्याचे म्हंटले जात आहे.नागोरी यांनाही फाशीची शिक्षा झाली असून ते सध्या भोपाळ मध्यवर्ती कारागृहात आहे.
 
जमियतचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना सय्यद अर्शद मदनी यांनी विशेष न्यायालयाचा निर्णय 'अविश्वसनीय' असल्याचे म्हटले आहे. या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्याची घोषणा करण्यात आली आहे. मौलाना अर्शद मदनी हे दारुल उलूम देवबंदचे प्राचार्यही आहेत. वृत्तानुसार, मदनी यांनी म्हटले आहे की, ज्यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे त्यांची बाजू देशातील नामांकित वकील उच्च न्यायालयात मांडतील.गरज पडल्यास सर्वोच्च न्यायालयात जाण्याचेही त्यांचे म्हणणे आहे.
 
 
या प्रकरणात शिक्षा सुनावण्यात आलेल्या नागोरीसह सिमीचे आणखी ५ दहशतवादी भोपाळ तुरुंगात बंद आहेत. शिवली, शादुली, अमिल परवेझ, कमरुद्दीन नागोरी, हाफिज आणि अन्साब अशी त्यांची नावे आहेत. यापैकी अन्साबला जन्मठेपेची तर इतर ५ जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. रिपोर्टनुसार, शिक्षा सुनावल्यानंतरही नागोरीच्या चेहऱ्यावर सुरकुत्या नव्हती. “आमच्यासाठी संविधानाचा काही फरक पडत नाही, आम्ही कुराणच्या निर्णयाचे पालन करतो,” असे तुरुंग अधीक्षक दिनेश नरगावे यांना सांगितले.


 सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना, २६ जुलै २००८ रोजी अहमदाबाद शहरात सुमारे ७० मिनिटांत २१ बॉम्बस्फोट झाले होते. या बॉम्बस्फोटांमध्ये ५६ जणांचा मृत्यू झाला असून सुमारे २०० लोक जखमी झाले आहेत. अहमदाबाद पोलिसांनी या प्रकरणी २० एफआयआर नोंदवले होते, तर सुरतमध्ये १५ स्वतंत्र एफआयआर नोंदवण्यात आले होते.



 

 


Powered By Sangraha 9.0