"आश्चर्य...बंधू म्हणवून घेणाऱ्या गप्प का" भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांचा सवाल

17 Feb 2022 15:36:53

chitra wagh 
 
 
मुंबई : एका तरुणीला लग्नाचं आमिष दाखवत तिच्यावर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली शिवसेनेचे उपनेते रघुनाथ कुचिक यांच्यावर आज बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी रघुनाथ कुचिक यांच्यावर जोरदार टीका केली आहे. "बंधू म्हणवून मिरवणारा कामगारांचा स्वंयघोषित पुढारी व शिवसेनेचा उपनेता रघुनाथ कुचिक वर बलात्कार गर्भपाताचा गुन्हा शिवाजीनगरमध्ये दाखल झालाय. मुख्यमंत्री महोदय…फक्त गुन्हा दाखल करून नाही, तर आदरणीय बाळासाहेबांना स्मरुन तात्काळ कारवाई करा...आश्चर्य...बंधू म्हणवून घेणा-या गप्प का." अशा शब्दात भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी टीका केली आहे.
 
 
 
चित्रा वाघ यांनी काही वेळापूर्वी आणखी एक ट्विट करत मुख्यमंत्र्यांवरही टीका केली आहे. "महाराष्ट्रातील महिला मुलींवर बलात्काराच्या घटना जवळपास रोज घडताहेत…साकीनाका घटनेनंतर विशेष अधिवेशनाची मागणी आम्ही केली त्याला अतिशय निर्लज्जपणे मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या उत्तराचा निषेध आम्ही पत्र जाळून केला. गुन्हे दाखल केलेल्याला घाबरत नाही..नडत राहू आणि तुम्हाला भिडत राहू" असं त्यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0