मुंबईकरांच्या जीवाशी खेळ : मुंबईत दीड हजार अवैध लॅब्स

16 Feb 2022 12:47:40
                        
bmc


मुंबई: मुंबईसह राज्यात अवैध पॅथलॅब्स ची संख्या वाढतेच आहे अशी माहिती महाराष्ट्र अससोसिएशन ऑफ प्रॅक्टिसिंग पॅथॉलॉजि अँड मायक्रोबायॉलॉजिस्ट या संघटनेने दिली आहे. या संघटनेने दिलेल्या माहितीनुसार एकट्या मुंबई मध्ये दीड हजार अवैध पॅथलॅब्स काम करत आहेत. चार वर्षांपासून पालिकेकडे या लॅब्स वर कारवाई करण्याची मागणी ही संघटना करत आहे. पण अद्याप संबंधित विभागाकडून कुठलीही कारवाई झालेली नसल्याचे समोर आले आहे.
कायद्याने प्रत्येक पॅथॉलॉजि लॅबमध्ये मान्यताप्राप्त पॅथॉलॉजिस्ट असणे बंधनकारक असते. पण कित्येक ठिकाणी या नियमाचे सर्रास उल्लंघन होते आहे. या लॅब्स मध्ये पदवीधारक पॅथॉलॉजिस्ट ठेवण्यापेक्षा लॅब तंत्रद्यांच्या मार्फत हे काम करवून घेतले जात असल्याचे या संघटनेचे म्हणणे आहे. अशा लॅब्स वर कारवाई करण्याची मागणी संघटनेने केली होती. त्यावर महापालिकेच्या संबंधित विभागाने या बनवत लॅब्सचा सर्व्हे करण्याचा आदेश चार वर्षांपूर्वी दिला होता. पण तेव्हापासून पुढे यावर कुठलीच कारवाई झालेली नाही. "हा सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळ आहे" असे संघटनेचे अध्यक्ष संदीप यादव यांनी सांगितले.


 
Powered By Sangraha 9.0