वॉशिंग्टन डी. सी. : हॉलिवूडच्या सुप्रसिध्द अभिनेत्री जूलिया रॉबर्ट्स यांनी हिंदू धर्माविषयी केेलेले विधान सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. सोमवार, दि. १४ फेब्रुवारी रोजी 'हेरिटेज गाय' या ट्विटर अकाऊंटवर यासंदर्भात पोस्ट करण्यात आली आहे. यातून त्यांनी हिंदू धर्माबद्दल असलेली आस्था आणि प्रेम व्यक्त केल्याचे दिसून येते.
"मला हिंदू असल्याचा अभिमान आहे. हिंदू धर्माने संपूर्ण मानवजातीला गीता, वेद, योग, ध्यान, आयुर्वेद अशा अनेक गोष्टी दिल्या आहेत. मी माझ्या मुलाचे नाव हिंदू देवतांप्रमाणे लक्ष्मी, गणेश, कृष्ण आणि बलराम असे ठेवले आहे. मी हिंदू धर्म आचरणात आणण्याचा प्रयत्न करत आहे. मी जप करण्यासाठी, प्रार्थना म्हणण्यासाठी आणि उत्सव साजरा करण्यासाठी नेहमी मंदिरात जात असते.", असे त्यांनी ट्विट करत म्हटले आहे.