राऊतांच्या अट्टाहासमुळे मुंबईकर कोंडीत

15 Feb 2022 17:22:24
              
sanjay raut
 
 
मुंबई : मंगवारी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेना भवनात पत्रकार परिषद असल्याचे जाहीर केले आणि यादिवशी सकाळपासूनच दादरमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. विशेष म्हणजे या परिसरातील व्यापारांनादेखील याचा त्रास सहन करावा लागला. तसेच, नागरीकांच्या सुविधेसाठी मुंबई पोलिसांनी ट्वीट करत पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन केले. तसेच, शिवसेना भवनाबाहेर जी गर्दी झाली, त्यामुळे ही पत्रकार परिषद होती की सोहळा? असा प्रश्न विचारण्यात येत आहे.
 
 
 
                                 
 
 
सोशल मिडियावर यावरुनाता अनेक प्रश्न विचारण्यात येत आहेत. "शिवसेना भवनाबाहेर गर्दी जमली होती. राज्यात कोरोना निर्बंध चालू आहेत. मुंबईत सुद्धा ठिकठिकाणी गर्दी कमी करण्यासाठी, मास्क नाही घातला तर दंड वसूल करण्यासाठी मार्शल्स फिरत आहेत. मग हे कोरोना, निर्बंध, मास्क फक्त जनते साठीच आहेत का? आता ते महापालिकेचे मार्शल्स कुठे आहेत? आता कुठेय कोरोना? " असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.मुख्यमंत्र्यांच्या कोरोना निर्बंधांच्या अतिरेकाने नागरिक त्रस्त असताना त्यांच्याच पक्षाचे लोक सर्रास नियम पायदळी तुडवतात हे मुख्यमंत्री कसे चालवून घेतात? असा प्रश्न लोक विचारात आहेत.
 
                             
 
 
 
Powered By Sangraha 9.0