Share Market : गुंतवणूकदारांना १० लाख कोटींचा फटका

    दिनांक  14-Feb-2022 19:16:11
|
                          
mumbai
 
 
 
मुंबई: शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूक दारांसाठी सोमवारचा दिवस काळा दिवस ठरला. बाजार तब्बल १७४७ अंशांनी कोसळला. गुंतवणूकदारांचे तब्बल १० लाख कोटींजे नुकसान झाले. युक्रेन वादामुळे जगभर झालेले तणावाचे वातावरण, एबीजी शिपयार्ड कंपनी घोटाळा या घटनांचे सावट बाजारावर दिसले.युक्रेन वादामुळे जगावर युद्धाचे ढग जमा व्हायला सुरुवात झाली आहे. त्याचाच परिणाम म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाचे दर ९४ डॉलर प्रती बॅरल इतके झाले आहेत. तर भारतात उघड झालेला २२ हजार ८४२ कोटींचा एबीजी शिपयार्ड घोटाळा या सर्व घटना या जोरदार उलथापालथीला कारणीभूत ठरल्या आहेत.
 
 
निफ्टी मध्येही तब्बल ४ टक्क्यांची घसरण दिसून आली. निफ्टी ५३२ अंशांनी घसरून १६८४२. ८० अंशांवर बंद झाला. बाजारावर झालेला हा परिणाम तात्पुरता असेल आणि सर्व गोष्टी लवकरच पूर्ववत होतील असे मत अर्थतज्ज्ञांनी नोंदवले आहे. एप्रिल २०२१ नंतर बजाजरात झालेली ही सर्वात मोठी घसरण आहे. सार्वजनिक बँका, ऑटो, बॅंक, ऑईल ॲंड गॅस, एफएमसीजी, फार्मा, मेटल, रिॲलिटी, कॅपिटल गुड्स या सर्वच क्षेत्रात मोठी घसरण झाली आहे.
 
 
 

 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.