मुंबई: जगभरातील ४०४ दाटीवाटीच्या शहरांमध्ये मुंबई हे जगातील पाचवे दाटीवाटीने शहर ठरले आहे. ग्लोबल टेकनॉलॉजी या संस्थेकडून केल्या गेलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे. बंगळुरू १०व्या क्रमांकाचे, दिल्ली ११व्या क्रमांकाचे तर पुणे २१व्या क्रमांकाचे दाटीवाटीचे शहर ठरले आहे. मुंबई मध्ये वाढती लोकसंख्या आणि मुंबई शहरावरील ताण यांवरच हा मुद्दा गंभीर बनत चालला आहे.
कोरोना काळात मुंबईमधील गर्दी घटली होती. पण निर्बंध शिथिलतेनंतर पुन्हा गर्दी वाढू लागल्याचे समोर आले आहे. २१ ऑगस्ट २०२१ हा मुंबईतला सर्वात जास्त वाहतूक कोंडीचा दिवस ठरला आहे. २०२० मध्ये मुंबई जगातील दुसऱ्या क्रमांकाचे दाटीवाटीचे शहर ठरले होते पण कोरोना काळात गर्दी घटल्यामुळे पाचव्या क्रमांकावर आले तरी हेही गंभीरच आहे. वाढत्या गर्दीने नागरिकांचे आरोग्य, पर्यावरण, सार्वजनिक सुविधा यांच्यावर ताण येतो आणि त्याचा फटका मुंबईकरांना दरवर्षी बसत असल्याचे दिसून आले आहे.