राऊतांचा खोटारडेपणा पुराव्यांसकट उघड ..

11 Feb 2022 14:21:10

raut.jpg

नवी दिल्ली :
नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत काही दिवसांपूर्वी लता मंगेशकर यांच्या निधनावर दुःख व्यक्त करत असताना त्यांची एक आठवणही सांगितली. त्या आठवणीत त्यांनी काँग्रेसने कशा प्रकारे मंगेशकर कुटुंबावर अन्याय केला याची आठवण सांगितली. मोदी म्हणाले कि ज्यावेळेस लतादीदींचे लहान भाऊ हृदयनाथ मंगेशकर यांनी सावरकरांचे गीत ध्वनिमुद्रित केल्यानंतर त्यांना काहीच दिवसांनी आकशवाणीतून काढून टाकण्यात आले.

संजय राऊत म्हणतात हे खोटे ..

शिवसेना या पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी मोदींच्या या वक्तव्याला विरोध केला आहे.हृदयनाथ मंगेशकर यांची नोकरी गेली नव्हती असे त्यांनी मांडले. मी स्वतः आकाशवाणीवर मला जेव्हा कळायला लागले तेव्हापासून ते गीत ऐकत आहे.




सत्य काय आहे ?


हृदयनाथ मंगेशकर यांनी स्वतः याबद्दलची आठवण एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना सांगितली आहे. मी आकाशवाणीवर काम करत होतो. आकाशवाणीवर १९५५ साली पगार किती होता तब्बल ५००  रुपये. आज ५०० रुपये आपल्याला फार छोटे वाटतात. ५५ साली ५०० रुपये म्हणजे.. त्यावेळी माणूस राजा असायचा. वय किती होतं तेव्हा माझं तर १७ वर्ष. त्यावेळी पहिलं गाणं केलं होतं मी ते 'तिन्ही सांजा सखे' हे.आणि अशाप्रकारचे अनेक गीत मी केले.

माझ्या कुटुंबाचे उत्तम संबंध स्वातंत्र्यवीर सावरकरांशी होते. आम्ही सर्व त्यांना तात्या म्हणायचो. मी त्यांच्याजवळ गेलो व विनंती केली कि मला त्यांची एक कविता द्यावी ,ज्याचे मी संगीतात रूपांतर करू शकेन. त्यांनी मला त्यांचे ' ने मजसी ने मजला परत मातृभूमीला' हि कविता दिली. मी ती ध्वनिमुद्रित केली आणि आकाशवाणीवर सादर केली . त्यानंतर आठच दिवसांत माझी नोकरी गेली.




Powered By Sangraha 9.0