लसीकरणामुळे मिळाला अर्थव्यवस्थेला बुस्टर! : विकासदर ७.८ टक्के राहणार!

10 Feb 2022 11:37:24

shaktikant das
 
 
  
 
मुंबई: रिझर्व्ह बँकेकडून पतधोरण जाहीर करण्यात आले आहे. रिझर्व्ह बँकेकडून सलग दहाव्यांदा व्याजदरात काहीही बदल करण्यात आलेला नाहीये. रेपो दर ४ टक्के तर रिव्हर्स रेपो दर ३.५ टक्के ठेवण्यात आलेला आहे. यंदा या व्याजदरांत बदल होण्याची अपेक्षा होती पण देशांतर्गत महागाई आणि जागतिक बाजारातल्या तेलाच्या वाढत्या किमती यांमुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे. जागतिक पातळीवर महागाई आटोक्यात आणण्यासाठी इतर देशांच्या बँकांनी व्याजदरांमध्ये वाढ केली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने मात्र आपले अर्थव्यवस्थेस अनुकूल धोरण कायम ठेवले आहे. भारताचा विकास दर येत्या आथिर्क वर्षांत ७.८ टक्के इतका राहील असे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे.
 
 
"भारतासह जगाला कोरोना महासाथीच्या काळात अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले. अजूनही ही आव्हाने सामोरे संपलेली नाहीत. भारतासमोरच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेनेही मोलाची भूमिका बजावली आहे. वाढते लसीकरण, भारतीय पतधोरणातील सातत्य यांमुळे आपण कोरोना साथीचा मुकाबला चांगल्या प्रकारे केला आहे आणि ही महासाथ आटोक्यात आशक्तिकांत दास णली आहे." असे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर यांनी सांगितले.
 
 
 
Powered By Sangraha 9.0