गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या अस्थींचे रामकुंडात विधीवत विसर्जन

    10-Feb-2022
Total Views |

lata mangeshkar
 
नाशिक : गान सरस्वती भारतरत्न लता मंगेशकर यांच्या अस्थिंचे काल रामकुंडात आदिनाथ मंगेशकर यांच्या हस्ते विसर्जन करण्यात आले.
 
अस्थि विसर्जनास स्थानिक नागरिकांची प्रचंड गर्दी रोखण्याच्या दृष्टीने पोलिसांनी काल सकाळपासुन रामकुंडाकडे जाणारे मार्ग बॅरिकेट्स, दोर्‍या लावून बंद केले होते. रामकुंड परिसरात अस्थि विसर्जन जागेपर्यंत रंगहीन रांगोळी काढण्यात आली होती. यावेळी पंचवटीतील रामकुंडाकडे जाणार्‍या मार्गावर आणि रामकुंड परिसरात लता दिदींना श्रद्धांजली अर्पण करणारे भव्य होर्डिंग्ज लावण्यात आले होते. सतीश शुक्ल यांच्या मार्गदर्शनाखाली शांताराम भानोसे आणि चमूने कलश पूजनासह विधी आणि पौरोहित्य केले. मंगेशकर कुटुंबातील निकटवर्तीय, स्नेही आणि स्थनिक मान्यवर यांना बसण्यासाठी रामकुंडावर मंडप आणि स्टेज बैठक व्यवस्था करण्यात आली होती.
 
यावेळी लता दिदींच्या भगिनी मीना मंगेशकर, आदीनाथ, बैजनाथ मंगेशकर, मीनाताई यांचे पती योगेश खर्डीकर, राधा मंगेशकर, कृष्णा आदिनाथ मंगेशकर, मयुरेश पै, मुख्यमंत्र्यांचे सचिव मिलिंद नार्वेकर तसेच आ. सुहास कांदे, माजी महापौर विनायक पांडे, बबन घोलप, सुनील बागुल, दत्ता गायकवाड, अजय बोरस्ते, सुधाकर बडगुजर, विलास शिंदे, वसंत गीते, भाऊसाहेब चौधरी, विजय करंजकर, मिलिंद नार्वेकर, प्रशांत जुन्नरे,रामसिंग बावरी, कल्पना पांडे, श्रीकांत बेणी, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, मनपा आयुक्त कैलास जाधव, ग्रामीण पोलीस अधिक्षक सचिन पाटील, फरहान खान आदी उपस्थित होते.