गेल्या काही महिन्यांपासून खेळात सातत्य न दाखवू शकणाऱ्या अजिंक्य रहाणेला नुकतेच आपले उप-कर्णधारपद गमवावे लागले आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखती दरम्यान बोलताना "जेव्हा लोक बोलतात माझं करिअर संपले आहे, तेव्हा मला हसू येते" असे मत रहाणेनी व्यक्त केले. या शिवाय "ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सिरिजमध्ये मी दिलेले योगदान कोणालाही आठवत नसल्याचे" दु:ख रहाणेने व्यक्त केले. पुढे बोलताना "ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेत मी घेतलेल्या निर्णयांमुळेच भारताला विजय मिळाला, मात्र त्या विजयाचे श्रेय इतर खेळाडूंना दिले जात आहे" अशी खंतही यावेळी रहाणेनी व्यक्त केली.
दरम्यान, जानेवारी २०२१ पासूनच रहाणे आऊट ऑफ फॉर्म असल्याचे दिसून आले आहे. त्याने जानेवारी २०२१ नंतर १९.९५ च्या सरासरीने केवळ ५४७ धावा काढल्या आहेत. त्यामुळे श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या आगामी मालिकेत अजिंक्य रहाणेच्या जागी कुठल्यातरी युवा खेळाडूला संधी मिळे शकते याची शक्यता नाकारता येत नाही.