सोनियांनी थकविलं घराचं भाडं! : थकित रक्कम ५ लाखांहून जास्त

10 Feb 2022 18:37:20

Sonia Gandhi
 
 
नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या बंगल्यासोबतच काँग्रेसच्या आणखी ३ नेत्यांच्या सरकारी घरांवर तब्बल पाच लाखांहून अधिक भाडे थकीत असल्याचे उघड झाले आहे. माहिती अधिकारातून (आरटीआय) मिळालेल्या एका माहितीच्या आधारे ही माहिती समोर आली आहे. गुजरातमधल्या एका व्यक्तीने आरटीआय दाखल करून केंद्रीय नगरविकास मंत्रालयाला याबाबत विचारणा केली होती. यामुळे काँग्रेस नेत्यांना लाजवेल असे कार्य आता भाजपकडून करण्यात येणार आहे. थकित भाडे भरण्यासाठी भाजपचे नेते तेजिंदर सिंग बग्गा यांनी देणग्या गोळा करण्याची मोहीम सुरू केली आहे. "या मोहिमेतून जेव्हा घराच्या थकीत भाड्याएवढी देणगी जमा होईल, तेव्हा हे भाडे सोनिया गांधींना पाठवले जाईल.", असे त्यांनी ट्विट करत सांगितले आहे.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0