पेंग्विन...! चक्क महापौरांनीच मान्य केलं!

01 Feb 2022 12:21:04

Pengyin

मुंबई : "मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्वतःच मान्य केलं की त्यांच्या युवराजांना पेंग्विन म्हणतात.", असा टोला भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी लगावला आहे. "मुंबई महापौर अहमदाबादचा पेंग्विन कक्ष पाहण्यासाठी साडेपाचशे किमी प्रवास करत पोहचल्या. मात्र, त्यांना वरळी सिलिंडर स्फोटातील मृत झालेल्या लहानग्या बाळासाठी साडे आठ मिनिटांचा प्रवास करावा, असं वाटलं नाही.", असे चित्रा वाघ यांनी मुंबई महापालिकेच्या कारभाराबद्दल सुनावले.

चित्रा वाघ, म्हणाल्या, "मुंबईच्या सन्माननीय महापौरताईंचं पेंग्वीन प्रेम आज जगजाहीर झालं. त्या स्वत: ५५० किमी प्रवास करत पेंग्वीनच्या भेटीला गेल्या..पण वरळी येथे सिलेंडर स्फोटात तडफडून जीव सोडलेल्या लहानग्या बाळासाठी साडे आठ मिनिटांचा प्रवास करण्याची त्यांना आवश्यकता वाटली नाही"

"आज त्यांनी स्वतः कबुल केलं की त्यांच्या युवराजांना पेंग्विन म्हटलं जातं. अर्थात युवराज त्यांचं अभिनंदन करतीलच. गुजरातच्या आदरतीथ्यानं महापौर ताई भारावून गेल्या. अर्थात आदरतीथ्य करणं ही आपली संस्कृतीच आहे. पण सध्या तुमची सुलतानकीशी जवळीक वाढत असल्यानं अशा आदरतीथ्यानं भारावून जाणं हे सहाजिक आहे. पण या एका गोष्टीमुळं मुंबईकरांना एक नक्की कळलं की सत्ताधारी मुंबई महापालिका ही फक्त पेंग्विन आणि हायवे कन्स्ट्रक्शनच्या भल्यासाठी काम करत आहे. मुंबईकरांच्या दैनंदिन अडचणींशी यांना काहीही देणंघेणं नाही."


Powered By Sangraha 9.0