सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राला मदतीचा हात

01 Feb 2022 15:15:50
                          
budget 2022 msme
                 
 
नवी दिल्ली: कोरोना महासाथीच्या काळात होरपळून निघालेल्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राला दिलासा देण्यात आला आहे. या क्षेत्राला मदत करण्यासाठी तातडीचा पतपुरवठा योजना तयार करण्यात आली होती. कोरोनाच्या धक्यातून अजूनही हे क्षेत्र सावरले नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
 
तातडीचा पतपुरवठा योजनेची व्याप्ती वाढवून ती ५० हजार कोटींवरून ५ लाख कोटी इतकी करण्यात आली आहे. हॉस्पिटॅलिटी आणि कंत्राटी पद्दतीने काम करणाऱ्या उद्योगांना पूर्वपदावर येण्यासाठी अतिरिक्त भांडवलाची गरज आहे या उद्योगांना मदतीचा हात देण्यासाठी तसेच भांडवल पुरवठा करण्यासाठी या तातडीचा पतपुरवठा योजनेला मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
 
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या विकासाठी ५ वर्षांचा कार्यक्रम पीएम गती शक्ती हाती घेण्यात आला आहे. या योजनेतून नोव्हेंबर पर्यंत ५ कोटी ४६ लाख कामगारांना फायदा झाला असल्याचे सांगितले आहे. नोव्हेंबर २०२१ पर्यंत २. २८ लाख कोटींचे कर्ज वितरित झाल्याची माहिती आज अर्थमंत्र्यांनी दिली. आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत या क्षेत्राला पूर्वपदावर आणण्यासाठी काम केले जात आहे. उत्पादन वाढीसाठी पीएलआय योजना सुरु केली आहे. या योजनेमुळे भौतिक, डिजिटल अश्या दोन्ही सुविधा पुरवून व्यवहार खर्च खर्च कमी होण्यास मदत झाली आहे, यामुळे हे क्षेत्र लवकरच पूर्वपदावर येईल असे अर्थमंत्र्यांनी आज सांगितले.
 
 
 
Powered By Sangraha 9.0