गुजरात निसटलं! काँग्रेस कार्यकर्त्यांनं फोडलं स्वतःच्याच पक्षाचं कार्यालय

08 Dec 2022 14:48:06

Rahul Gandhi

गांधीनगर : गुजरात विधानसभा निवडणूकीत काँग्रेसचा सुफडा साफ झाल्याने वैतागलेल्या कार्यकर्त्यांने स्वतःच्याच पक्षाचे कार्यालय फोडले आहे. "माझं संपूर्ण आयुष्य सगळ्यात निघून गेलं. पण कुठलही पक्षातील नेतृत्व गुजरातकडे लक्ष देत नाही. कुठलंही परिवर्तन आजतागायत झालेलं नाही. आतल्या आत तिकीटांसाठी राजकारण खेळलं जात आहे. निवडणूक निकालात काँग्रेसची परिस्थिती सुधारावी यासाठी आम्ही दिवसरात्र एक केलं होतं. पण काँग्रेसी नेते थंड बसून आहेत. एकटे राहुल गांधीच फक्त ग्राऊंडवर दिसत आहेत.", अशी टीका या संतप्त कार्यकर्त्यांने स्वतःच्याच पक्षावर केली आहे.

"पंतप्रधान नरेंद्र मोदी रोड शो करत होते तेव्हा फक्त काँग्रेसी नेत्यांनी त्यांच्यावर टीका करण्याशिवाय दुसरं काही केलं नाही. स्वतःच्या पक्ष वाढविण्याऐवजी फक्त टीकाटीपण्णी करत बसले," असा आक्रोश त्याने प्रसारमाध्यमांसमोर व्यक्त केला. राहुल गांधींसह सर्वच नेत्यांना त्याने धारेवर धरले होते. त्यांच्यासह जमा झालेल्या अन्य कार्यकर्त्यांनी गांधीनगर स्थित काँग्रेस कार्यालय फोडले. दरम्यान, काँग्रेसला गुजरात विधानसभा निवडणूकीत केवळ १६ जागांवर समाधान मानावे लागले. आम आदमी पक्षाला पाच तर भाजपने स्वतःचाच रेकॉर्ड तोडत तब्बल १५८ जागांवर विजय मिळविला आहे.




Powered By Sangraha 9.0