उद्धव ठाकरे कुणापुढे अडीच वर्ष झुकले हे सगळ्यांनी पाहिलंय!

06 Dec 2022 15:03:29

उद्धव ठाकरे कुणापुढे अडीच वर्ष झुकले हे सगळ्यांनी पाहिलंय !
मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक राज्यांचा सीमा प्रश्न तापला असताना आज महाराष्ट्राचे मंत्री शंभूराज देसाई आणि चंद्रकांत पाटील यांनी आजचा आपला बेळगाव दौरा पुढे ढकलला. शंभूराज देसाई यांनी हा दौरा अद्याप रद्द झाला नसल्याचे सांगत या दौऱ्याबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेतील असे म्हटले. आम्हाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आदेश दिला तर कोणत्याही परिस्थितीत जाऊ शकतो. पण आम्हाला सामंजस्याची भूमिका घ्यायची आहे, असे ते म्हणाले.
तसेच सीमाप्रश्नाचा मुद्दा आमच्यासाठी केव्हाच संपला आहे. महाराष्ट्राचे आक्षेप त्यांनी सुप्रीम कोर्टासमोर नेले आहेत. त्यामुळे ही लढाई सुप्रीम कोर्टातच लढू, असंही बसवराज बोम्मई यांनी स्पष्ट केलं. तरीही बेळगावातील मराठी भाषिकांच्या भेटीसाठी, त्यांच्यावरील अन्याय दूर करण्यासाठी आम्ही बेळगावात जाणार आहोत, असं वक्तव्य शंभूराज देसाई यांनी केलंय. कर्नाटक सरकारच्या इशाऱ्याला आम्ही जुमानणार नाहीत, असंही देसाई म्हणाले.


दरम्यान, बेळगावला जाण्यास महाराष्ट्राचे मंत्री धजावत नाहीत, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात येतेय. त्यावरून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. संजय राऊत यांनीही यावरून महाराष्ट्र सरकारवर टीका केली. राऊत यांच्या टीकेला उत्तर देताना शंभूराज देसाई म्हणाले, "मीच संजय राऊत यांना आव्हान देतो. बॉर्डरला तरी शिवून यावं. आम्ही तर केव्हाही जाऊ, पण तुम्हाला बेळगाव कोर्टानं 8 दिवसांपूर्वी बेळगावला बोलावलं. मग तुम्ही का जाऊन आला नाहीत? तुम्ही तर मुंबईत बसूनच सांगितलं. बेळगावात गेलो तर मला अटक करतील. खोट्या केसेसमध्ये अडकवतील. तुम्ही साधं जायचं धाडसही दाखवलं नाही. मुंबईत बसूनच ओरडलात." अशी टीका देसाई यांनी केली.
Powered By Sangraha 9.0