जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीतील सुंदर चित्र!

05 Dec 2022 13:26:51

Narendra Modi


नरेंद्र मोदी


गांधीनगर
: गुजरात विधानसभा निवडणूकांच्या दुसऱ्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदानाला सोमवारी सकाळी ९ वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदान सुरू राहिल. राज्यातील १४ जिल्ह्यांच्या ९३ विधानसभा जागांसाठी हे मतदान होत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही सोमवारीच मतदान केले. मोठ्या संख्येने मतदानासाठी उतरा, असे आवाहनही त्यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक फोटो ट्विट करुन मतदान केल्याबद्दलची माहिती दिली.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींही मतदान करताना इतर मतदारांप्रमाणे रांगेत उभे राहिले. त्यांच्यापूर्वी एक महिला मतदार रांगेत उभी होती. मोदी रांगेत असल्याचे पाहून संबंधित महिलेने त्यांना पुढे जाण्याची विनंती केली. मात्र, मोदींनी त्या महिलेला आधी मतदान करण्याची विनंती केली. मोदींनी सर्वसामान्यांप्रमाणेच मतदान कक्षात रांगेत उभे राहून मतदान केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सत्तेत आल्यापासून व्हीव्हीआयपी कल्चर बाजूला सारत जनसामान्यात मिसळण्याची सुरुवात केली होती. त्याचं एक प्रतिबिंब आज पुन्हा दिसलं.

दरम्यान, या प्रकरणी ठाणे भाजप महिला मोर्चा ट्विटरद्वारे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले आहे. देशाचे पंतप्रधान, ज्यांचं नेतृत्व अवघ्या जगाने मान्य केलं आहे ते आपले पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोणतीही विशेष सवलत न घेता आपले मतदानाचे कर्तव्य नियमाप्रमाणे रांगेत उभे राहून, आपला नंबर येण्याची वाट पाहून बजावले. तर दुसरीकडे महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंनी कोविड प्रोटोकॉल झुगारून वाधवान कुटुंबाला माणुसकीच्या निकषांवर महाबळेश्वर पर्यटनाची परवानगी दिली होती विशेष सवलतीत. आठवतंय ना उद्धव ठाकरे, असा टोलाही त्यांना लगावला आहे.



Powered By Sangraha 9.0