मराठी भाषेसाठी ‘विश्व मराठी साहित्य संमेलन’

विधानसभा अध्यक्ष अ‍ॅड. राहुल नार्वेकर यांची माहिती

    30-Dec-2022
Total Views |

Rahul Narvekar

 
मुंबई : “मराठी भाषेचे संवर्धन व जगभर प्रसार व्हावा, यासाठी महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे आणि सांस्कृतिक कार्य व उद्योग विभागाच्या सहकार्याने दि. ४ जानेवारी ते दि. ६ जानेवारी २०२३ रोजी नॅशनल स्पोर्टस् स्टेडियम, वरळी, मुंबई येथे ‘मराठी विश्व संमेलना’चे आयोजन करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील सर्व खासदार, आमदार व लोकप्रतिनिधी यांनी सदर कार्यक्रमाच्या तीनही दिवशी सहभागी व्हावे,” अशी विनंती विधानसभा अध्यक्ष अ‍ॅड. राहुल नार्वेकर यांनी आज विधानसभेत केली.


अ‍ॅड. नार्वेकर म्हणाले की, “या संमेलनात जगातील वेगवेगळ्या खंडातील २० देशांमधील विविध शहरांतून मराठी भाषेच्या संवर्धनासाठी काम करणार्‍या विविध संघटनांचे ४९८ प्रतिनिधी व त्याचप्रमाणे भारतातील विविध शहरांत राहणार्‍या व मराठी भाषेच्या संवर्धनाचे काम करणार्‍या संस्थांचे सुमारे एक हजार प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत मराठी संस्कृती व मराठी भाषा यांचेबाबत चर्चासत्र, मराठी संस्कृतीचे प्रदर्शन करणारे नाट्यसंगीत, वादन इ. विविध कलांचा अविष्कार त्याचप्रमाणे विविध चर्चासत्रांचे दि. ४ ते दि. ६ जानेवारी २०२३ रोजी आयोजन करण्यात आले आहे.”


मराठी उद्योजक व गुंतवणूकदार यांचा परस्पर संवाद

 
“या कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध उद्योग महाराष्ट्रामध्ये यावेत याकरिता गुंतवणूकदार व उद्योजक यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी दि. ६ जानेवारी २०२३ रोजी महाराष्ट्रात गुंतवणूक करणारे मराठी उद्योजक व गुंतवणूकदार यांचा परस्पर संवाद होणार आहे. दि. ४ जानेवारी २०२३ रोजी सकाळी १० वाजता मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत समारंभाचे उद्घाटन करण्याचे नियोजित आहे, अशी माहिती अ‍ॅड. नार्वेकर यांनी दिली.
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.