लव्ह जिहादविरोधात कठोर कायदा येणार! सकल हिंदू समाजाला राज्य सरकारचे आश्वासन

29 Dec 2022 11:14:45


लव्ह जिहादविरोधात कठोर कायदा येणार! सकल हिंदू समाजाला राज्य सरकारचे आश्वासन
मुंबई : राज्यात लव्ह जिहादविरोधात कठोर कायदा लागू होण्याची चिन्ह असतानाच सकल हिंदू समाजाने आज अधिवेशनादरम्यान भेट दिली. याविषयी अधिक माहिती भाजपा आमदार नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, "राज्यभरामध्ये जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये हिंदू समाजाचे जे फार मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या संख्येने जे काय मोर्चे निघतायेत हिंदू समाज प्रत्येक जिल्ह्यामध्ये एकत्र येऊन एक मुखी मागणी राज्य सरकारकडे जो करतो आहे ती प्रामुख्याने मागणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोन्ही नेत्यांपर्यंत सकल हिंदू समाजाची मागणी आणि भावना आणि संदेश पोहचावा म्हणून राज्यभरातून जिल्ह्या जिल्ह्यातून माझ्या भगिनी आज आमच्या अधिवेशनामध्ये आलेल्या होत्या."

"त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीची भेट घेऊन महाराष्ट्र राज्यामध्ये उत्तर प्रदेश, गुजरात, कर्नाटक आणि अन्य राज्यांसारखा एक लव्हजिहाद विरोधी कायदा धर्मांतर विरोधी कायदा आमच्या महाराष्ट्रामध्ये पण लवकरात लवकर यावा लागू करावा अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीकडे केलेली आहे. लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा आपल्या राज्यामध्ये का आला पाहिजे? आणि सकल हिंदू समाजाची जी काय भावना आहे त्या माझ्या या सगळ्या भगिनींच्या माध्यमातून सरकारपर्यंत पोहचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी बोलत असताना अतिशय सकारात्मक पद्धतीने त्यांनी यांना सांगितलेलं आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये लवकरात धर्मांतर विरोधी कायदा लागू होईल."

"त्यासंबंधीचं निवेदनही त्यांनी दिल आहे. आम्हाला विश्वास आहे. की यानंतर येणाऱ्या काही महिन्यामध्ये जसं त्यांनी आम्हाला सांगितलं. आमच्या महाराष्ट्रामध्ये एक कडक धर्मांतर विरोधी कायदा निश्चित पद्धतीने लागू होईल असा विश्वास या निमित्ताने आम्ही व्यक्त केलेला आहे." असा विश्वास व्यक्त करताना राणे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.
Powered By Sangraha 9.0