ITI विद्यार्थ्यांसाठी इंग्रजीसोबतच जर्मन, फ्रेंच, जपानी भाषेचेही प्रशिक्षण

29 Dec 2022 18:55:46
 
Lodha
 
 
 
नागपूर : राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला (आयटीआय) भेट देऊन त्याची पाहणी केली. द सॉल्ट एव्हिएशन व कौशल्य विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने येथे सुरू असलेल्या एरॉनॉटिकल स्ट्रक्चर अॅण्ड इक्युपमेन्ट फिटर या व्यवसायाला त्यांनी भेट दिली.
 
 
फ्रान्स येथील प्रशिक्षक तसेच आयटीआय विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांनी बदलत्या काळाला अनुषंगिक असलेला हा अनोखा अभ्यासक्रम आयटीआयमध्ये सुरू करण्यात आल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले. सध्या एव्हिएशन क्षेत्रात प्रचंड रोजगाराच्या संधी उपलब्ध असल्याने हा अभ्यासक्रम नाशिक व पुणे येथेही सुरू करण्याबाबत मंत्री लोढा यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
 
 
मंत्री लोढा म्हणाले की, एव्हिएशन क्षेत्रात अल्प मुदतीचे अभ्यासक्रम जास्तीत-जास्त राबविण्याबाबत व त्यातून रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने पाऊले उचलणे आवश्यक आहे.
Powered By Sangraha 9.0