लवासा प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल; अजित पवार म्हणाले ...

29 Dec 2022 12:03:45
 
Lavasa case
 
 
 
 
नागपूर : लवासाप्रकरणात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. ॲड. नानासाहेब जाधव यांनी मुंबई उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे. शरद पवार, अजित पवार , सुप्रिया सुळे, अजित गुलाबचंद यांच्यासह ज्या अधिकाऱ्यांनी लवासाला परवानगी दिली त्या सर्वांवर सीबीआयने गुन्हे दाखल करावेत आणि त्याचा तपास करावा अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. या याचिकेवर आता नवीन वर्षात सुनावणी होण्याची शक्यात आहे.
 
 
दरम्यान राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली असून ते म्हणाले, "लवासामधील सर्व गोष्टी या पारदर्शक पद्धतीने झाल्या आहेत. प्रसिद्धीसाठी अशाप्रकारचे आरोप केले जातात. त्यांना माहीत आहे पवार कुटुंबावर आरोप केल्यानंतर प्रसिद्धी मिळते. अशाप्रकारची प्रसिद्धी मिळवण्यासाठीच हे आरोप करण्यात आले आहेत. लवासामधील सर्व गोष्टी पारदर्शक आहेत." अशी प्रतिक्रीया त्यांनी यावेळी दिली.
 
 
 
Powered By Sangraha 9.0